सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:53 IST)

उन्हाळ्यात फायदेशीर असणारा बहुगणी कांदा

उन्हाळ्यात ऊन लागते व अतिशय डोकेदुखी सुरू होते अशावेळी कांदा वाटून डोक्याच्या टाळूवर लावल्यास डोके दुखणे थांबते.
 
नाकातून रक्त जात असल्यास ताबडतोब कांदा फोडून कमी चिरुन सुंघवावा. रक्त थांबते.
 
सर्दी सारखी होऊन नाक वाहात असल्यास कांद्याच्या पाण्याचा वास घ्यावा. (कांदा किसून पिळून पाणी काढावे) तसेच जेवणात कांदा जास्त घ्यावा.
 
कांदा गरम करून कुस्करून त्यातील पाणी काढावे व त्यात मीठ मिसळून ते पाणी पिण्यास द्यावे. पोटदुखी थांबते.
 
उलटी होत असल्यास कांदा खाण्यास द्यावा किंवा कांद्याचा वास घेण्यास सांगावे.
 
कान दुखत असल्यास कांदा, थोडासा गरम करून त्याचे पाणी काढून कानात टाकावे व कांद्याचे 2-3 थेंब गरम पाणी पिण्यास द्यावे.
 
उन लागल्यास पूर्ण शरीरावर कांद्याचे पाणी (कांदा किसून पिळून पाणी काढावे.) लावावे. तळपाय, हात व कपाळाला लावावे.
 
विंचू किंवा मधमाशा किंवा विषारी कीडा चावल्यास त्यावर कांद्याचे पाणी लावावे.
 
कांद्याला वाटून ते पाण्यात मिसळून घरात शिंपडल्यास किडे, पिसवा व मुंग्या जातात.
 
पागल पिसाळलेला कुत्रा चावला तर कांदा व तुरटी लावल्यास व कांद्याचे पाणी पिण्यास दिल्यास कुत्र्याचे विष कमी होते. 
 
कांद्याचा रस व मोहरीचे तेल लावल्यास गळ्याच्या गाठी कमी होतात. 
 
उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागून एकदम ताप येतो. अशावेळी कांद्याचे पाणी पिण्यास द्यावे व हातपायाला कपाळाला व कपाळाच्या दोन्ही बाजूला कांदा किसून ताजा रस लावावा. 
 
कांदा थंड असल्याने शरीरातील उष्णता निघून थंड वाटते व ताप कमी होतो. प्रवासात किंवा उन्हाळ्यात बाहेर जाताना कांदा नेहमी जवळ ठेवावा. 
 
अशाप्रकारे हा बहुगुणी कांदा उन्हाळ्यात उपयोगी आहे.