सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (18:01 IST)

cumin water benefits जिऱ्याचे पाणी कशाप्रकारे फायदेशीर आहे जाणून घ्या

cumin water benefits
जेवण्यात चव वाढवण्यासाठी जिर्‍याचा वापर केला जातो पण हेच जिरं आम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहो की जिर्‍याचे पाणी कशा प्रकारे लाभदायक असते. 
 
जिरेचे पाणी कसे बनवायचे
दोन ग्लास पाणी घेऊन गॅसवर ठेवा
यानंतर त्यात 1 चमचा जिरे घाला.
पाणी अर्धा होईपर्यंत उकळा, म्हणजे 1 ग्लास
त्यानंतर पाणी गाळून प्या
 
ऍनिमियाशी बचाव करेल - जिर्‍याचे पाणी रक्तात हिमोग्लोबिन वाढवत, कारण जिर्‍यात आयरनची मात्रा जास्त असते.  
 
बेबीमध्ये जन्मदोषाचा धोका कमी करतो - प्रेगनेंट महिलांना जिर्‍याचे पाणी रोज प्यायला पाहिजे, ज्याने बेबीमध्ये जन्‍मदोष होण्याची शक्यता कमी होते.  
 
ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो - जिर्‍यात पोटॅशियमची उत्तम मात्रा असते, जे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करते.  
 
इम्‍यूनिटी वाढवते - यात आयरन असतं, जे इम्‍युनिटी वाढवतो. त्या शिवाय व्हिटॅमिन अं, सी आणि एंटीऑक्‍सीडेंटची मात्रा देखील असते, जी शरीरात ऊर्जा भरते.  
 
ऍसिडिटी दूर करते - प्रेग्नेंसी दरम्यान महिलांना ऍसिडिटीचा त्रास जास्त प्रमाणात होतो, पण या दिवसांमध्ये जिर्‍याच्या पाण्याचे सेवन केले तर हा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो.