गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

सतत होते का तळपायांची जळजळ, अवलंबवा हे घरगुती उपाय

What is the solution for burning soles
अनेक लोकांना ही समस्या असते की, त्यांच्या तळपायांची सतत आग होते. यामुळे या लोकांना उन्हाळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळेस ही समस्या एवढी वाढते की, रोटरी देखील त्रास होतो ज्यामुळे हे लोक रात्रभर झोप घेऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या तळपायांची जळजळ कमी होईल. व तुम्हाला आरामदायी वाटेल. 
 
बर्फाने शेकावे- तळपायांची जळजळ कमी होण्यासाठी तुम्ही बर्फाचा उपयोग करू शकतात. सर्वात सोपी आणि परिणाम कारक उपाय म्हणजे बर्फाने तळपाय शेकावे. एका बादलीमध्ये थंड पाणी घ्यावे. ज्यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालावे. आता पायांना कमीतकमी 20 मिनिट पर्यंत पाण्यात भिजवून ठेवावे. तसेच या दरम्यान तळाहातींनी पायांना मॉलिश करा. असे केल्यास पायांची होणारी जळजळ थांबेल.  
 
मुलतानी माती लेप- मुलतानी मातीचा लेप हा थंड असतो. उन्हाळयात जर चेहरा काळा पडला असेल तर मुलतानी माती फायदेशीर असते. तसेच पायांची जळजळ होत असेल तर तळपायांना मुलतानी मातीचा लेप जरूर लावला. यामुळे पुष्कळ आराम तुम्हाला जाणवेल. 
 
एलोवेरा- एलोवेरा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. एलोवेरा गरामध्ये लिंबू रस मिस्क करावा तसेच हा लेप पायांना कमीतकमी 20 मिनिट लावावा. असे केल्यास तळपायाची जळजळ नक्कीच थांबेल. 
 
मोहरीचे तेल- मोहरीचे तेल देखील पायांसाठी खूप गुणकारी असते. मोहरीचे तेल घेऊन तळपायांची 5 मिनिट पर्यंत मॉलिश करावी. यामुळे तळपायांना होणाऱ्या जळजळ पासून नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik