शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (20:29 IST)

उन्हाळ्यात दादचा त्रास वाढतो, या घरगुती उपायांनी करा सुटका

दाद हा मुलांमध्ये सामान्य आहे परंतु प्रौढांना देखील होऊ शकतो. हे खूप त्रासदायक असू शकते. त्यामुळे खाज सुटते आणि पुरळ येतात. ही पुरळ वर्तुळाकार दिसते. बुरशीमुळे होणारा दाद हा अत्यंत संसर्गजन्य असतो. अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल क्रीम्स आहेत ज्यांचा वापर करून दादवर उपचार करू शकता, परंतु आपण आणखी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्त होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 हळद -हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. अँटिसेप्टिक ते अँटी-इंफ्लेमेट्री पर्यंत गुणधर्म असतात.  हळदीचा वापर फेस मास्क, संधिवात इत्यादींमध्ये वापरले जाऊ शकते. दादपासून सुटका मिळवण्यासाठी साधारण अर्धा चमचा हळद थोडे खोबरेल तेलात मिसळा. चांगल्या प्रकार मिसळून ते संक्रमित त्वचेवर लावा.
 
2 कोरफड- या मध्ये  अँटी बेक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असतात.हे गुणधर्म  त्याच्या पानांमध्ये आहे. जर दाद ची समस्या ने त्रस्त आहात तर कोरफडीचा पानाचा तुकडा तोडून दाद वर  घासून घ्या. घरात कोरफडीचे रोप ननसल्यास बाजारातून कोरफडीचे जेल आणून ते देखील वापरू शकता.
 
3 एप्सम मीठ-  एप्सम मीठ आणि कोमट पाणी एक उत्तम नैसर्गिक एक्सफोलिएंट आणि अँटीफंगल उपचार करतात. मूलभूतपणे, ते मॅग्नेशियम सल्फेट आहे. बुरशीला वाढवणाऱ्या कोणत्याही ओलाव्याला दूर करण्यास उपयुक्त आहे. दादवर उपचार करण्यासाठी, एक कप एप्सम मीठ आणि एक कप कोमट पाणी घ्या. नियमितपणे हे वापरा.
 
4 निलगिरी तेल -बुरशीजन्य संसर्गावर उपचार करण्यासाठी  निलगिरी तेल हा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे. तेल हे आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे आणि त्यातील अँटीफंगल आणि अँटी बेक्टेरिअल गुणधर्म बुरशीला मारतात, शिवाय त्यात एक ताजे सुगंध आहे. निलगिरी तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळा आणि प्रभावित भागात लावा.
 
5 टी ट्री ऑइल - हे अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल उपचारांसाठी चांगले आहे. त्याचे अँटी-फंगल गुणधर्म दादशी लढण्यासाठी एक उत्तम घटक बनवतात. तेलाचे काही थेंब पाण्यात घोळून घ्या. नंतर काही कॉटन बॉलने हळुवार प्रभावित भागावर लावा. प्रभावी परिणामांसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा हे करा.