मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (09:00 IST)

सर्दी पडसं झाले असल्यास घरगुती उपाय -

सर्दी पडसं बरे करण्याचा काही विशेष उपाय नाही . सर्दी पडसं एक प्रकारचे संसर्ग आहे जे विषाणूंमुळे पसरते. ह्याचे काही सामान्य लक्षण म्हणजे डोकं दुखणे, नाक वाहणे,ताप येणं, डोळ्यात खाज येणं, घशात खवखव, अंग दुखणे इत्यादी आहे. वेळीच ह्यावर उपचार केले नाही तर समस्या वाढू शकते. या साठी काही घरगुती उपायांना अवलंबवून ह्यावर आराम मिळवू शकतो.  चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 सर्दी पडसं असल्यास लसूण वापरा -
लसूण आणि मधाचा वापर करून आठवड्यातून दोनवेळा लसूण खावे.
 
2 मध- 
एक ग्लास गरम दुधात मध घालून रात्री  झोपण्याच्या पूर्वी प्यावं.
 
3 मसाल्याचा चहा-
धणे,जिरे,शोप, मेथीदाणे,खडीसाखर,दूध,पाणी हे साहित्य घालून चहा करा सर्वप्रथम धणे,जिरे,मेथीदाणे,शोप भाजून दळून भुकटी करून  घ्या. 1 कप  पाणी गरम करून त्या मध्ये ही भुकटी दीड चमचा घाला आणि खडीसाखर मिसळा. उकळून घ्या दूध मिसळून उकळून घ्या आणि गाळून गरम प्या. दररोज हे प्यायल्याने आराम मिळतो.
 
4 आलं आणि मध - 
आलं बारीक करून ठेचून घ्या हे गरम पाण्यात घालून उकळवून घ्या नंतर पाणी गाळून घ्या त्यात मध मिसळा आणि पिऊन घ्या.  
 
5 काळी मिरी- 
काळी मिरपूड कोमट पाण्यात घालून मिसळून चांगल्या प्रकारे ढवळा आणि प्या.