सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

घरचा वैद्य : नक्की करून बघा

कांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन नामक घटक असतो. हा घटक हृदयाच्या  आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो.
 
गरोदर महिलेने लसणाचे सेवन केल्यास वायुप्रकोप, गर्भास विकृती, शरीराला आचके येणे यांसारखे विकार होत नाहीत व हळूहळू ती स्त्री निरोगी व सुदृढ बनते. लसणामुळे प्रतिकारशक्ती वाढते. 
 
बडीशेप काही तास पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढावा. हा अर्क घेतल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच लहान मुलांना पोटदुखी, उलटी आदी होणार्‍या त्रासावरही यामुळे गुण येतो.
 
जाईच्या वेलाची साल दंतमंजनासाठी वापरता येते. तोंड आल्यास जाईची पाने चावून त्याचा रस तोंडात घोळवावा व नंतर थुंकून टाकावा. यामुळे आराम मिळतो.
 
आंबमुळे चेहरा नेहमी मुलायम, तुकतुकीत दिसतो. आंब्याचा रस काढून त्याच्या निम्मे दूध, थोडीशी सुंठ आणि एक चमचा तूप मिसळून प्यावे. सातत्याने केल्यास चेहरा कांतिमय बनतो.
 
डाळिंब्याच्या दाण्यावर मीरपूड आणि मीठ टाकून खाल्ल्याने गॅसमुळे होणारी पोटदुखी थांबते. 
 
बटाटय़ाच सालीत आणि सालीच्या खालच्या भागात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, बी 6 व क ही जीवनसत्त्वं असतात. त्यामुळे ही भाजी साली न काढताच शिजवावी.