शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (10:41 IST)

वारंवार तहान लागत असेल तर करा हे घरगुती उपाय ....

बर्‍याच वेळा आपल्याला पाणी प्यायल्यानंतर ही तहान शमत नाही. वारंवार तहान लागत असेल तर हे घरगुती उपाय करून पहा.... 
 
* पाण्यात मध टाकून गुळण्या कराव्यात तसेच लवंग चघळल्याने वारंवार तहान लागत नाही. 
 
* अननसावरील साल चाकूने काढून त्यातील गराचे बारीक बारीक तुकडे करा. ते साखरेच्या पाकात शिजवून तयार झालेला मुरंबा उन्हाळ्यात खाल्याने शरीरातील पाणी कमी होत नाही व तहानही वारंवार लागत नाही. तसेच हृदयरोगावरही अननसाचा मुरंबा लाभदायी आहे. 
 
* गायीच्या दूधाचे दही 125 ग्रॅम, साखर 60 ग्रॅम, तुप 5 ग्रॅम, मध 3 ग्रॅम व मिरे-इलायची पेस्ट 5-5 ग्रॅम घ्यावे. दह्याला चांगले फेटून घ्या. त्यानंतर त्यात इतर सामुग्री टाकून स्टीलच्या भांड्यात ठेऊन द्या. दिवसभरातून दोन ते तीन वेळा थोडे-थोडे दही सेवन केल्याने वारंवार लागणारी तहान शमते. 
 
* भात शिजवलेल्या पाण्यात मध टाकून ते पाणी दिवसातून दोन वेळा प्याल्याने तहान कमी लागते व ऊनही लागत नाही.