शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (10:00 IST)

कर्करोगापासून रक्षण करेल लीची

* लीचीच्या पल्पमध्ये फ्लॅवोनॉइड्स असतात ज्याने कर्करोगापासून रक्षण होतं. या फळात असणारे फ्लॅवोन्स, क्वेरसिटिन, केमफेरोल सारखे तत्त्व कँसरच्या पेशीची वाढ थांबवण्यात मदत करतात.

* लीचीत पॉलीफेनॉल्स असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. जे लोकं रोज एक ग्लास लीची सरबत पितात त्यांचं ब्लड प्रेशर सामान्य राहतं.

* लीचीमध्ये असलेले सॉल्यूबल फायबरने पचनशक्ती चांगली राहते. याने पोटात जळजळ आणि आतड्यांसंबंधी तक्रार उद्भवत नाही.

* लीचीमध्ये फॉस्फरस आणि मॅग्निशियमची मात्रा भरपूर असते. लहान मुलांसाठी हे खूप फायदेशीर असून यात कॉपर आणि मँगनीज सारखे मिनरल्स असल्याने लीची हाडांसाठीदेखील फायदेशीर आहे.

* लीचीमध्ये कॅलरीज खूप कमी असते म्हणून ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी रोज लीची खायला हवी.