बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: रविवार, 3 फेब्रुवारी 2019 (00:52 IST)

जाणून घ्या ज्येष्‍ठमधाचे गुणकारी उपयोग

'ज्येष्ठमध' हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्‍यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते. गॅस्ट्रिक अल्सर तसेच लहान आतड्यामध्ये होणार्‍या ड्यूओडनल अल्सरवरही ज्येष्ठमध हे लाभदायी ठरत असते. 
 
ज्येष्ठमध एक वनौषधी असून त्याचे झाड साधारण पाच ते सहा फूट उंचीचे असते. ज्येष्ठमधाच्या काड्या या चवीने गोड असतात. त्याचा उपयोग स्वयंपाक घरातील मसाल्यामध्येही केला जा‍त असतो. 
 
आयुर्वेदात ज्येष्ठमधाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोट दुखी, दमा, स्तनाचे आजार, गुप्त आजार आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. परदेशात स्त्रीयांच्या सेक्ससंबंधी आजारांवर त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो. ओल्या ज्येष्ठमधामध्ये पन्नास टक्के पाणी असते. ते सुखल्यानंतर केवळ दहा टक्के उरते. ज्येष्ठमधात ग्लिसराइजिक अ‍ॅसिडचे प्रमाण असल्याने त्याची चव साखरे पेक्षाही गोड असते.
 
सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोट दुखी, दमा, स्तनाचे आजार, गुप्त आजार आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे.
 
पोटाचे विकार-
ज्येष्ठमधचे मुळचे चूर्ण पोटाच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी आहे. पोटात झालेली जखम त्याने लवकर भरून निघते. ज्येष्ठमधचे एक ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत नियमित सेवन केल्याने स्तन व योनीसंबंधी आजार दूर होऊन त्यांच्यात सेक्सविषयी भावना जागृत होत असतात. तसेच स्त्रियांना आपले सौंदर्य अनंत काळापर्यंत टिकवून ठेवता येत असते. 
 
अल्सर- 
गॅस्ट्रिक अल्सर व लहान आतड्यांना होणार्‍या ड्यूओडनल अल्सरवर ज्येष्ठमध हे अत्यंत प्रभावी औषध आहे. इतर औषधांच्या तुलनेत ज्येष्‍ठमध, अल्सर हा आजार लवकर बरा करत असते. 
 
रक्ताची उल्टी-
रक्ताची उल्टी झालेल्या रुग्‍णाला दूध किंवा मधासोबत ज्येष्ठमध दिल्याने त्याला आराम पडतो. तसेच उचकी, सर्दी या आजारावर ज्येष्ठमध चूर्ण अधिक गुणकारी आहे.