शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (22:26 IST)

झोप येत नसेल तर करा मालिश!

आजचे धावपळी जीवन व कामाच्या दगदगीमुळे निंद्रानाश ही एक मोठी व जटील समस्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे. झोप लागत नाही, या मागे शाररिक व मानसिक असे दोन्हीही कारणे असू शकतात. शरीराची मालिश केल्याने किंवा अंघोळीच्या पाण्यात काही तेल मिसळल्याने या समस्येतून आपण स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो.
 
तीस मिली खोबरेल तेलात पाच थेंब कॅमोमाइल ऑइल, पाच थेंब मेजोरम ऑइल, पंधरा थेंब सॅंडल वुड ऑइल तसेच पाच थेंब क्लॅरीसेज ऑइल एकत्र करून सर्वांची मालिश केल्यान आराम मिळत असतो.
 
मान, पाठ व कंबर यांच्यावर व्यवस्थित मालिश करावी. अंघोळीसाठी केल्या कोमट पाण्यात वरील तेलांचे मिश्रण टाकावे.
 
आपल्याला आजार किंवा अस्थीव्यंग असेल तर मालिश करण्याआधी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.