रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी पिस्ता खा

उच्च रक्तदाब, किंवा हायपरटेंशन एक सामान्य आजार आहे. खासकरून 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला या रोगापासून पीडित राहतात. आजकल युवा देखील या आजारांपासून ग्रसित आहे. उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण तणाव, खराब भोजन, लठ्ठपणा, व्यायामाची कमतरता, उच्च कोलेस्ट्रॉल, असामान्य चयापचय इत्यादी आहे. जर उच्च रक्तदाबाचा उपचार नाही केला तर हा डोकेदुखी, थकवा आणि हृदय रोगांचे कारण बनू शकतो. 
 
जर तुम्ही उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आम्ही तुम्हाला असा रामबाण नुस्खा सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळू शकते. 
 
आवश्यक साहित्य 
- ड्राय पिस्ता 3 ते 4 
- पाणी 1 ग्लास
 
पिस्त्यात अंटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि कॉपर सारखे इतर आवश्यक पोषक तत्व असतात. 
 
तयार करण्याची विधी
एका ग्लास पाण्यात पिस्ता घालून रात्रभर भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर या पाण्याचे सेवन नरून पिस्ता खाऊन घ्या. उचित परिणाम मिळण्यासाठी ही क्रिया किमान 3 महिन्यापर्यंत सुरू ठेवा.