रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

Home Remedies : पिवळे दात या समस्येवरील उपाय

तुमची सुंदरता तुमच्या चेहऱ्यावरून उमटत असते. तसेच चेहऱ्यावरील गोड हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालते. पण कधी कधी दातांची समस्या चेहऱ्यावरील हास्य लपवण्याचे कारण बनते. जसे की दातांचे पिवळेपण, ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे अनेक वेळेस अपमानाची जाणीव होते. दातांचे पिवळेपण दूर करण्यासाठी काही खास टिप्स आहे ज्यांना आत्मसात केल्यावर तुम्ही घरीच या समस्येचे पासून मुक्ती मिळवू शकतात आणि दूधसारखे पांढरे शुभ्र दांत होतील.  
 
मोहरीचे तेल आणि सेंधव मीठ- या दोघांना समान प्रमाणात एकमेकांमध्ये मिक्स करावे आणि या पेस्टने ब्रश करावा. हा उपाय दातांचे पिवळेपण दूर करायला मदत करेल. तसेच दातांची आयु वाढवेल. 
 
लिंबू- दातांचे पिवळेपण दूर करण्यासाठी लिंबाचे साल फायदेशीर असते. सकाळी ब्रश करण्यापूर्वी दातांवर लिंबाचे साल घासावे. यामुळे दातांचे पिवळेपण दूर होण्यास मदत होईल. 
 
बेकिंग सोडा- दातांचे  पिवळेपण दूर करण्यासाठी बेकिंग सोडा देखील मदत करतो. याकरिता एक चमचा बेकिंग सोडा घ्या व याने दातांवर ब्रश करा. हा उपाय काही दिवसांतच तुमच्या दातांचे पिवळेपण दूर करेल. 
 
कडुलिंबाची काडी- कडुलिंबाची काडी पिवळ्यादातांसाठी रामबाण उपाय आहे. कडुलिंबाची काडी दातांवरील पिवळेपण दूर करून दातांना चमकदार बनवते. तसेच पिवळ्या दातांच्या समस्येवर कडुलिंबाची काडी हा एक प्रभावी उपाय आहे. 
 
मीठ- आपल्या स्वयंपाक घरातील मीठ हे दातांचे पिवळेपण दूर करण्यास मदत करते. सकाळी ब्रश करण्यापूर्वी मीठने ब्रश करावा, यामुळे दातांचे पिवळेपण दूर होईल.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik