- लाईफस्टाईल
» - आरोग्य
» - घरचा वैद्य
सर्वरोगहारी माती!
ताप, खोकला, डोकेदुखी, हगवण आदी आजारांवर माती रामबाण आहे. पंडित जमिनीला खोदून सहा इंच थर बाजूला करावा व काळसर माती काढावी. ती कुटून उन्हात वाळवावी. नंतर गव्हाच्या जाड छिद्राच्या चाळणीने ती गाळावी व थैलीत भरून ठेवावी. मातीत बेचाचे पाणी घालून भांडे सावलीत ठेवावे व माती सतत ओली ठेवावी. ही माती जळणे, भाजणे, पोळणे, सूज, जखम या सर्व अपघातांवर तसेच श्वानदंशल विंचूदंश, मधमाशी दंश व सर्प दंशावर रामबाण आहे. ताप, खोकला, हगवण या रोगांना कारणीभूत असते ते बिघडलेले पोट. अशावेळी पोटावर अर्धा इंच जाड मातीचा थर एक तास ठेवल्यास व गुदद्वारावाटे पाण्यात लिंबू पिळून कोमट पाणी पोटात दिल्यास पोटातील घाण बाहेर पडते व रोग्याला त्वरित आराम मिळतो. कँसर, वातरोग, चर्मरोग, लैंगिक रोग, स्त्री रोग इत्यादी सर्व रोगांवर माती चमत्कारासारखी काम करते. मानसिक रोगांना माती त्वरित नष्ट करते. माती ही शोधन चिकित्सेचे मुख्य अंग शोधन चिकित्सा ही वैदिक चिकित्सा आहे. यात चाळीस निसर्गशक्ती काम करतात. रोग्याला कितीही रोग असले तरी ही चिकित्सा रोग्याला रोगमुक्त करून नवजीव देते. माती ही या शोधनचिकित्सेचे मुख्य अंग आहे. शोधनचिकित्सेच्या मदतीने आपण शंभर-दीडशे वर्षे जगू शकतो.