गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:13 IST)

कोरोना परवडला पण ...

1. घरात फेरफटका मारला तर  ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ना...माझ्या सर्व मेहनतीवर पाणी.
 
2. झोपलो तर ---- सर्व बेडशीट खराब केली, तुम्हाला झोपण्याचीही शिस्त नाही.
 
3. काही खायला मागितले तर__ आताच तर दिले होते ना ? काम नाही धाम...इतक्यात भूक लागली ?
 
4. घरी काम करणार्‍या कामवाल्याबाईला आवाज दिला तर -- काय हवंय आता ? मला सांगा की..मी आहे ना जिवंत..!
 
5. टिव्ही लावला तर --  मला जरा पडू द्या हो...सारखं आपलं रांधा वाढा- उष्टी काढा...जीव दमून गेलाय माझा.
 
6. बेडवरून जरा उठलो तर---- आता कुठे चाललात उठून ?
 
7. अंथरूणातून नाही उठलो तर---  सकाळपासून बेडवर लोळतायं...कंटाळा कसा येत नाही, कुणास ठाऊक ?
 
8. चहा मागितला तर--- किती चहा प्यायचा हो? त्याला काही लिमीट आहे की नाही ? ऑफिस नाहीये हे सतत चहा ढोसायला...माझं काम वाढवताय फुकट..
 
9. बाटलीकडे नुसतं पाहिलं तर --- नाही हां....उगाच ज्यास्त शहाणे बनू नका.
 
10. घरातून बाहेर नुसतं पाहिलं तर ---- काय पहाताय ? कोणी नाहीये बाहेर... निवांत झोपून रहा.
 
11. थोडा झोपून राहिलो तर ---- उठा आता...घरी रहायचं म्हणजे लोळत पडायचं नाहीये... मला चादर नीट करायचीय बेडवरची...
 
12. मुलांना काही बोललो तर --- तुम्हाला काय त्रास होतोय मुलांचा ?

13. नाही बोललो तर --- काय उपयोग तुमचा घरी राहून ?तुम्ही काssही बोलू नका मुलांना...डोक्यावर बसवून ठेवलंय नुसतं!
 
14. जरा शेजारी मित्राकडे जातो, बोललो तर--- वेडे झालात काय ? तोंडाला फडकं बांधून कसल्या डोंबलाच्या गप्पा मारणार ? बसा गुपचूप घरात...
 
15. कोणाला घरी बोलावलं तर ----  खबरदार हां कोणाला बोलावलंत तर....कोणी माझ्या घरी आलं नाही पाहिजे...मोदींनी काय सांगितलंय, विसरलात का ?
 
16. संपूर्ण दिवस मोबाईलवर घालवला तर--- आता ठेवा की तो फोन...सारखं आपलं टुकटुक...टुकटुक...आम्हांला मान वर करायला फुरसत नाही आणि ह्यांना बरं मोबाईलवर चॅटिंग सुचतं ? ऑफिसमध्ये पण दिवसभर हेच करता की काय, देव जाणे.