सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (17:48 IST)

Just for Fun : कोरोना वर बंड्याने लिहिलेला निबंध

शिक्षक :  मुलांनो , उद्या वर्गात येताना  कोरोना  वर निंबध लिहून आणा.. 
बंड्याने लिहिलेला निबंध
कोरोना हा  एक  नवीन सण असून तो २०२० सालापासून  सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.  
 
चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा  करतात . तसेच हा एकमेव असा सण आहे जो. जगातील सर्व धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
 
ह्या सणात खूप सारे खाण्याचे फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून घरात आनंदाने राहतात. शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते. दुकाने, ऑफिस  सर्व बंद असतात. टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
 
या सणात तोंडाला मास्क लावून आणि एकमेकांपासून लांब अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा आणि टी शर्ट घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल बघत बसतात.
 
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो हॉस्पिटलमध्ये एकट्याने साजरा करावा लागतो. हा सण साजरा करताना जास्त उत्साह दाखवल्यास पोलीस काठीचा प्रसाद देतात..
 
(उद्या शाळेत बंड्याचा शिक्षण अधिकारी सत्कार करणार आहेत)