माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा
कैलासावर सुरु झाली सामानाची तयारी
लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी
पार्वती आली करुन हरितालिकेची पूजा
दूध आणून म्हणाली गणपतीला,"ऊठ माझ्या राजा"
शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ
म्हणाले, "गणोबा, तिकडे मोदक खूप नका खाऊ"
कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पीतांबर
म्हणाला, "गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर"
पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू
म्हणाली, "उंदराला ही दे, वाटेत नका रे भांडू"
या सगळ्यातंच गणपतीला आलं जरा भरुन
पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरुन
शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा
आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा
आतुरता फक्त तुझ्या आगमनाची...