शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम

१. 
एका वेळेस एकाने चिडावे.
२.
चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल. 
3.
घरात प्रत्येक गोष्ट बोलावी. लपवा छपवी नको.
४.
घरातील प्रत्येकाला ( लहान मुलांना पण ) मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.
५.
आपला नवरा/मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका.
६.
Space देणे आणि दिलेल्या Space चा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी.
७.
थोडं दुसऱ्या साठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका.
८.
आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काही तरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका. 
९.
आपल्या कला गुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कला गुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत ह्याचा विचार करू नका.
१०.
बोला, विचार करा, पण सगळं घरात. माहेरच्यांना ह्यात अजिबात ओढु नका. त्यांना सांगून त्रास मात्र  दोघांना होणार.
११.
जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.
१२.
जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे, हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका.
१३.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात रहा, सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास नको.