मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 30 डिसेंबर 2024 (11:54 IST)

मजेदार विनोद : 100 पैकी 90 गुण

whatsapp jokes
एक गोष्ट जी आजही मनात आहेत...
 
त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा शाळेत शिकायचो..!
 
मी माझ्या घरच्यांना माझी मार्कशीट दाखवली ज्यात मला गणितात 100 पैकी 90 गुण मिळाले होते..!
 
माझ्या घरच्यांनी मार्कशीट पाहिली आणि तू कधीपासून हुशार झालास 100 पैकी 90 मिळावे ऐवढा?
 
तू स्वतःच "0" वाढवले असे बोलून मला मारत होते आणि मी रडत होतो, मी "0" वाढवले ​​नाही असे म्हणत होतो..!
 
मी खरंच "0" वाढवले नव्हते मात्र घरातील लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मला मारहाण करत होते.
 
आज इतक्या वर्षांनंतरही मी "0" वाढले नाही असे म्हणेन...!
 
कारण मी "9" वाढवले होते