मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 22 एप्रिल 2025 (11:29 IST)

प्रिय दालचिनी ताईला जायफळ दादाचे पत्र

प्रिय दालचिनी ताईस,
 
जायफळ दादाचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, मागच्या आठवड्यात बदाम काका झाडावरून पडले होते, आता त्यांची तब्येत बरी आहे.
 
आनंदाची बातमी अशी श्री.लवंग यांची मुलगी चि .सौ.कां.मिरी हिचे लग्न कु.जिरे ह्याच्याशी ठरले आहे. 
स्थळ उत्तम आहे.  तिखट मावशी व गोड मसाले काका यांनी मध्यस्थी केली म्हणून हे लग्न जमले आहे. 
 
काजू व पिस्ता हे बि. कॉम झाल्यामुळे त्यांचा भाव खूप वाढला आहे. 
 
मोहरीला अजून शाळेत घातले नाहीं. 
 
कडीपत्ता पहिलीत आहे. 
 
दुःखाची गोष्ट म्हणजे साखर व चहा पावडर यांच्या लग्नाला विरोध झाल्यामुळे त्या दोघांनी सकाळी उकळत्या पाण्यात जीव दिला. 
घटनास्थळी कपबशी उपस्थित होती. 
 
बटाटेमामानी विळीवर खुपसून जीव दिल्यामुळे कांदेमामी स्वतः रडत होत्या व दुसऱ्यानाही रडवत होत्या. 
 
बाकी सगळे ठीक आहे. 
 
लसूण, कोथिंबीर , व खसखस ह्यांना गोड गोड पापा
 
तुझाच,
जायफळ दादा 
 
पत्ता- खलबत्ता-बेपत्ता ,
मुक्काम- अलीकडे, 
तालुका- पलीकडे, 
जिल्हा- सगळीकडे.