गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आजीची चौकशी

एकदा एका आजींनी हॉस्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या -
"मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का.. जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला..
'जरा दोन मिनिटं होल्ड करा हं' असं म्हणत तिथल्या ऑपरेटर नी तिसर्‍या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला.
नर्स म्हणाली - 'बर्‍या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
'वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!'- आजी म्हणाल्या.
नर्स - 'तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?'
'नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतीये 302 मधून ! मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी !!'