शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठी विनोद : गोष्ट पुण्यातली

manoranjan
एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,
Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे.
पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या.
पुणेकर शांतपणे म्हणाला - 
मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !
हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा, आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !
तूझी अड़चण दूर होईल...
पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय...