सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (11:11 IST)

हृदय घात !!

रोजच्याच रस्त्यावरून जाताना गेले काही दिवस एक "देखणा चेहरा" माझ्याकडे पाहून सुंदर हसतोय हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
 
नेमकं त्याच ठिकाणी रस्त्याला स्पीडब्रेकर असल्याने दोन क्षण जास्त रेंगाळायला मिळायचं.
 
चाळीशीत असूनही अस काही घडतंय म्हंटल्यावर एकदम मस्त फील यायला लागला होता. आत्मविश्वास वाढला होता. असे काही दिवस चालूच राहील, मग एक दिवस हिंम्मत करून तिला विचारलंच...
"काय म्हणतेस, रोज मला पाहून छान हसतेस मला ही बर वाटत तुला पाहून. मैत्री करूया की आणखी काही आहे मनात ?"
 
पुन्हा एकदा दिलखुलास हसली, माझ्या छातीत अणुबॉम्ब फुटावेत तशी धडधड होत असतानाच ती मला म्हणाली,
 
"अरे तस काहीच नाही, तू त्या स्पीडब्रेकर वरून जातोस ना तेव्हा तुझी ढेरी गदागदा हलताना पाहून मला जाम हसू येत ..."
 
मी सध्या दूरचा नवीन रस्ता निवडला आहे, त्याला स्पीडब्रेकर नाहीये...