मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा मुंबईकर पुणेकरांना छळतात...

स्थळ : पुणे,  वेळ दु. 1 ते 4 मधली..
एक मुंबई चा माणूस पुण्यात फिरत होता. 
पुण्यात काहीही अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. 
"टणक    ऊस" ???
हे नाव का ठेवले असेल?  
उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. 
त्याने बेल मारलीच.
एका म्हाताऱ्या ने पुणेरी चेहऱ्याने दरवाजा उघडला.
"कायय् ?" म्हातारा खेकसला 
"अहो ते... या बंगल्याचे नाव 
"टणक    ऊस" का ठेवलय ?"
म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"
" साँरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना "टणक    ऊस" काय प्रकार आहे?" चाचरत त्या माणसाने विचारलं... 
"निर्लज्ज आहात तुम्ही"
"ते झालंच पण "टणक    ऊस"....
"अहोssss..." म्हातारा फिस्करला 
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....