मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (13:38 IST)

Sunday Funny Marathi Joke -संडे स्पेशल मराठी जोक

jokes
गोलू  - काय रे तू तर डॉक्‍टरला भेटायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले...?
मोलू  - अरे यार उद्या जाईल,
आज थोडी तब्येत खराब आहे...!!!
गोलू -मग ठीक आहे आज तू आराम घे 
 
डॉक्टर रमेश ला बायकोच्या तब्बेतीची विचारपूस करतो 
डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
रमेश : बरं वाटतंय तिला आता,
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय.
 
 
आई :- बंड्या लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल!
बंड्या :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बंड्याला चांगलंच बदडून काढलं 
 
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
 
 
भिखारी- साहेब आधी तुम्ही 50 रुपये देत होता 
आता फक्त 10 रुपये देता 
असं का? 
गण्या- आधी मी सिंगल होतो.
आता माझे लग्न झाले 
भिखारी-  वा ! साहेब म्हणजे माझ्या पैशांनी बायको 
सोबत ऐश करत आहात 
 
Edited By - Priya Dixit