गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (12:54 IST)

शिक्षकाचा नादच नाय करायचा

एका वकिलाने आपली विहीर एका शिक्षकाला विकली. कागदपत्रे सर्व व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वकील शिक्षकाकडे गेला.  
 
वकील : मास्तर, मी तुम्हाला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही. तेव्हा तुम्हाला पाणी हवं असेल तर त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील.
 
शिक्षक : बरं झालं, आपण आलात आणि विषय काढला. नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होतो. तर मग आल्यासरशी तुम्ही तुमचं पाणी घेऊन जा नाहीतर माझ्या विहिरीचे भाडे तुम्हाला द्यावे लागेल. 
 
वकील : तसं काही नाही मास्तर, मी थोडीशी तुमची गंमत करत होतो.
 
शिक्षक: लेका, तुझे जज, मामलेदार, तहसीलदार माझ्याकडून शिकून गेलेत.....
 
शिक्षकाचा नादच नाय करायचा