शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (12:07 IST)

"मित्र !"

मित्र,मित्र,मित्र,म्हणजे तरी काय असतं,
'त्र'यस्थाला 'मी'मधे 
सामावून घेणारं सूत्र असतं.
उपऱ्यालाही आपलं म्हणणारं 
गोत्र असतं,
आणि अपरिचितामधलं 
चिरपरिचित चित्र असतं.
मिश्किल हास्य असतं,
आपुलकीचं दास्य असतं,
डोळ्यामधले अश्रू टिपणारं,
मलमली वस्त्र असतं.
हे तुझं,ते माझं,
असा दुजाभाव न करणारं क्षेत्र असतं,
हृदयातली भावना आणि 
भावनापूर्ण हृदय असतं.
मित्र,मित्र,मित्र म्हणजे 
सत्त्यातलं स्वप्न असतं आणि,
स्वप्नातल्या स्वप्नामधलं 
मधुर सत्त्यही असतं !"