शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जास्त ताणू नका , लाईटली घ्या

प्रत्येकांनी एकमेकाला
थोडं समजून घ्या 
खूप जास्त ताणू नका
सगळेच लाईटली घ्या  ll
 
थोडं फार मागे पुढे
होतच असतं
शंभर टक्के perfect 
कुणीच नसतं     ll
 
माणुसकीही सर्वांकडे 
असलीच पाहिजे
वागण्यातून नम्रता
दिसलीच पाहिजे  ll 
 
छोट्या छोट्या गोष्टी वरून
कशाला करायचं बंड
आपण गोड बोललं की 
समोरचा होतो थंड   ll
 
कधी कधी सारा विषय 
फारच क्षुल्लक असतो 
माणूस मात्र विनाकारण 
टेंन्शन मध्ये बसतो  ll
 
कसाही प्रसंग असला तरी
राहिलं पाहिजे शांत
आपल्या सहनशीलतेचा
होऊ देऊ नये अंत  ll
 
घर असो , ऑफिस असो
वा असो Whats app
भेटून घ्या , बोलून घ्या 
पडू देऊ नका gap  ll
 
भाषा असली स्वीट
की सगळं होतं नीट
कुणाचाच कुणाला 
येत नाही वीट  ll
 
झालं गेलं विसरून जा
घ्या हातात हात
निमित्ताने भेटलो आपण
द्या हासून साथ  ll