1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

स्लिम आणि ठणठणीत...

whats app message
आजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. 
केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. 
पण आजोबांच्या शतकाचं गूढ सगळ्यांना हवं होतं. 
आपल्या शहाण्णव वर्षांच्या सडपातळ पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगू लागले...
 
माझ्या पंचविसाव्या वर्षी माझं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही वेगळे राहू लागलो. 
काहि दिवसांनी आमच्यात तुमच्यासारखी भांडणे होऊ लागली. सततच्या भांडणाला कंटाळून आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला..
ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचे व पाच किमी चालून परत यायचे. तेंव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे. 
माझ्या उत्तम तब्येतीचे हेच गुपित आहे !
 
"अहो पण, आजी देखील स्लिम आणि ठणठणीत आहेत की , त्याच काय ? "
 
आजोबा म्हणाले, माझ्यावर विश्वास नसणे हेच तर भांडणाचे कारण असे.
मी पाच किमी चालत जातो की वाटेत पुढे कुठे जाऊन बसतो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे,
त्यामुळे तिचीही तब्येत ठणठणीत आहे !