Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रफू...

Updated: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (11:41 IST)
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा 'आलासच ना अखेरीस' हा माज ठेऊन. 
 
तो मला म्हणाला, 
"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली... 
काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास... 
ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं... 
आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता... 
वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली... 
त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच... 
मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन... 
तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'... 
ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी... 
नाही शिवू शकलो मी ते भोक... 
नाही करु शकलो रफू... 
नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छीद्र... 
माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...! 
गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत... 
'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात...  
म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे... 
आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला... 
यावेळी तू आपलं नातं 'रफू' केलेलं पहायला... 
त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला". 
 
सुन्न होऊन ऐकत होतो मी... 
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 
'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो', चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 
'तो' त्याने नकळत केलेल्या 'पापातून' अन् 'मी' नकळत दिलेल्या 'शापातून' ऊतराई होऊ बघत होतो... 
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 
दोघं मिळून एक नातं, नव्याने 'रफू' करू पाहत होतो!

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

Meghalaya Tourism ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य! मेघालय

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

पुढील लेख
Show comments