सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (14:41 IST)

माझं कमवणं माझा अभिमान आहे

काल एक मैत्रीण सांगत होती, माझ्या मिस्टरांना आवडत नाही बायकांनी नोकरी/बिझनेस करणे,  आणि एवढी मेहनत कशाला करायची? 
नवरा चांगले कमावतो, प्रॉपर्टी खूप आहे, मला गरज नाही जॉबची.
दुसरी एक म्हणते, आता जॉब म्हणजे फक्त घर manage करणे. कशाला नसती उठाठेव. मला कीव येत होती त्यांच्या विचारांची. कमवणं म्हणजे फक्त एक आर्थिक गरज आहे का? 
नक्कीच नाही.

माझं कमवणं माझी ओळख आहे.... 
पत्नी , सून या पलीकडची....
माझं कमवणं परतफेड आहे.....
माझ्या आई वडीलानी मला शिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची.....
माझं कमवणं माझ्या घरच्यांचे स्वप्न आहे.....
ज्यांनी मला घर सांभाळून बाहेर पडता येते हे शिकवले.....
माझं कमवणं माझ्या नवऱ्यासाठी अभिमान आहे.....
 चार चौघात तो बायकोची थट्टा करू शकत नाही.....
माझी कमाई माझ्या बहिणीसाठी एक प्रेरणा आहे....
माझी कमाई माझ्या वैचारिक पातळीचा पाया आहे....
माझी कमाई माझ्या अस्तित्वाचा भाग आहे....
माझा पगार नाही तर माझी कमाई माझा अभिमान आहे.....
कमवणे म्हणजे गरीब असणे......
कमवणे म्हणजे उठाठेव.....

हे असे विचारच आपल्याला मागे खेचतात. त्यामुळे हे विचार सोडून द्या. जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतः साठी काही तरी करा. विचारांचे standard सुधारले की व्यक्ती आपोआप स्टॅंडर्ड होते.