मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (13:33 IST)

बिचारा रिटायर्ड पति

1. रिटायर पति जास्त वेळ झोपला तर....
बायको : अहो उठा रिटायर झाला म्हणजे झोपून राहायचं का ....!
 
2. रिटायर पति लवकर उठला की....
बायको : म्हातारपणामुळे तुमची झोप झालीय कमी म्हणून दुसऱ्यांना झोपू देणार नाही का....!
 
३. रिटायर पति घरी बसला की....
बायको : सकाळ झाली की मोबाइल घेऊन बसताय,जरा चहा नाश्ता केलात दुसऱ्यासाठी तर बिघडेल काय ?
 
4. रिटायर पति जर जास्त वेळ घराबाहेर राहिला की...
बायको : कुठं होता एवढा वेळ .....मारत बाहेर, आता नोकरी धंदा नाही तर तोंडाने देवाचं नाव तरी घ्या...!
 
5. रिटायर पति जर पूजा अर्चा करु लागला की..
बायको : ही घंटी वाजवून काय होणार आहे ? तस असतं तर श्रीमंतांच्या यादीत सगळे पुजारी दिसले असते..
 
6. रिटायर पति मोकळ्या वेळात पैसा कमावण्यासाठी काही काम करू लागला तर...
बायको : आता कामात असल्याची नाटकं करू नका हे सगळे सात फेरे घेतेवेळी केलं असतं तर माझं जीवन सुखी झालं असतं, आता करून काय उपयोग ?
 
7. रिटायर पति जर पत्नीला फिरायला घेऊन निघाला तर.
बायको : हे बघा शेजारचे पाटील बायकोला फिरायला घेऊन उटी, काश्मीरला जातात नी तुम्ही मला बालाजी नी हरिद्वार दाखवताय...!
 
8. रिटायर पति समजा तिला नैनीताल, मसूरी, गोवा, माउन्ट आबू, ऊटी याठिकाणी फिरायला घेऊन गेला तर ....!
बायको : काय बोंबलत फिरताय ? आपलं घर काय वाइट आहे,फुकट पैसा वाया घालवायचा,एवढया पैशात माझ्या ४ बांगड्या झाल्या असत्या..!