मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (20:00 IST)

आताच्या पिढीतील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे

लिसन माझ्या सोन्या बाळा
केव्हाच झाली मॉर्निंग 
वेक अप फ्रॉम द बेड आता 
शेवटची ही वॉर्निंग
 
छानपैकी ब्रश कर 
चमकव तुझे टीथ 
स्मॉल थिंग समजू नकोस 
त्यातच तुझं हित
 
हॉट हॉट मिल्क केलंय 
घालून बोर्नव्हीटा 
या ड्रिंकने सहज फोडशील 
हाताने तू विटा
 
वन ग्लास ट्वाईस घेताच
व्हीटामीन्स मिळतील मेनी 
थोड्याच दिवसात तुही 
होशील महेंद्रसिंग धोनी
 
मॅथ्सवाल्या टीचरला त्या
विचार सगळ्या क्वेरी 
पाठ कर लंच ब्रेकला 
मराठी लॅंग्वेज स्टोरी
 
स्कूल फिनिश करून इव्हला 
होम झटपट गाठ 
येता येता बसमध्येच 
फ्रेझेस होऊं दे पाठ
 
ग्रॅंडपाच्या बर्थ डेची 
आहे नाईट ला पार्टी 
असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये 
ग्रो होतात कार्टी !
 
मराठी च्या स्पीकिंगचेही
लावू तुला कोर्स, शोधलं खूप टाईम्स मध्ये पण सापडला नाही सोर्स !