गंमत
आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम, बर्गर, तंदूरी
इत्यादी घरी करून पाहिले जातात
आणि
कुरडई पापड, लोणची
विकत घेतात..!
दुसरी गंमत याऊलट म्हणजे,
घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात.
तिसरी गंमत याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.
आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.
आहे की नाही गंमत