रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Updated : शनिवार, 31 जुलै 2021 (17:17 IST)

फूल पाखरा

- सुभाष माधव दिक्षित, पुणे
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी
उंच उंच उडताना पाहून
दु:ख माझ्या मना भारी
 
नाजुक तुझी तनु
नाजुक तुझं पंख
धक्का लागेल त्यांना
रडू तुला येईल ना?
 
सुटी आहे आज मला
नाही जायचे शाळेला
एकटाच मी ना मित्र जवळ
कुठली पळापळ कुठले खेळ
 
चल ऊठ ये इकडे
खेळ खेळू आपण
नाचु बागडू मजा करु
आपण दोघे मिळून