अरे माकडा
- श्रीरंग मधुकर पांचाळ
अरे माकडा, पाय वाकडा,का टाकती तू? अकलेने तोकडा, आटलेला मुखडा वेडावूनी दावीसी दुसऱ्यास का तू?अरे माकडा, पाय वाकडाका टाकती तू? धुडगूस जीवनाचा करुनी सारा,मांडलास हा काय पसारामसा सावरी सांग एकटा तू?अरे माकडा, पाय वाकडाका टाकती तू? हातपायाने तू धाकटा नाकानेही तू नकटासांग काय करणार तू?चिडूनी दुसऱ्यावर ओरबाडून सारे खाणार का तू?अरे माकडा पाय वाकडाका टाकती तू?