जगणेच विसरलो-
डॉ. गुणवंत चिखलीकर
टी.व्ही. आला घरात नि बोलणेच विसरलोगाडी येता दारी, चालणेच विसरलो।।1।।ए.सी.च्या संगतीत, झाडाचा गारवा विसरलोसेंट-स्प्रे आला नि फुलाचा सुगंध विसरलो।।2।।कॅलक्युलेटर आला हाती नि पाढेच विसरलोफास्ट फूड आले नि तृप्तीचा ढेकर विसरलो ।।3।।रस्ते झाले डांबरी नि मृदगंध विसरलोफ्लॅटमध्ये राहून शेजारधर्म विसरलो।।4।।सिनेमांची पोस्टर बघून निरागस सौंदर्य विसरलोपॉप संगीत ऐकून भावगीते विसरलो।।5।।हसणे झाले दुर्मिळ नि जगणेच विसरलो।।6।।