ट्रिंग ट्रिंग...
|
आजीशी उग्गाच बोलू नकोस
नाटकाला जायचं ठरवू नको
सहलीला न्यायचं नावच नको
बाबा नि आई कामाला जातात
आजी नि मीच असतो घरात
|
कोण सांगेल गोष्ठी?
कोण करील थट्टा?
त्याच्यापेक्षा असं कर ना
थोडं थोडं माझ्याशी बोल ना
आईसक्रीम खायचा बेत ठरव ना!
आजी नि मी दोघंह ही जाऊ
तुझ्यासाठी देखील आणू थोडा खाऊ.
