1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
  4. Akbar Birbal Story Floating Palace

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

Akbar-Birbal
Kids story : एके दिवशी अकबर आपल्या दरबाऱ्यांना म्हणाला, "काल रात्री मी स्वप्नात एक सुंदर महाल पाहिला. सोन्या-हिऱ्यांनी बनलेला, हवेत तरंगणारा महाल.
 
जर कोणी असा महाल बांधला, तर मी त्याला एक हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देईन." अकबराच्या सल्लागारांनी त्याला हे अशक्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. निराश होऊन त्यांनी बिरबलाचा सल्ला घेतला.
काही दिवसांनी, एक गरीब माणूस अकबराकडे आला आणि म्हणाला, "महाराज, माझे सर्व पैसे चोरीला गेले आहे."अकबराने विचारले, "तुझे पैसे कोणी चोरले?" "महाराज, काल रात्री तुम्ही माझे पैसे चोरले. मी स्वप्नात पाहिले की तुम्ही माझ्या घरी आलात आणि पाच हजार सोन्याची नाणी चोरली."
"मूर्खा! स्वप्ने खरंच खरी होतात का?" "जर तुमच्या तरंगत्या महालाचे स्वप्न खरे होऊ शकते, तर माझे का नाही?" मग त्या माणसाने आपले खरे रूप प्रकट केले. सर्वांनी पाहिले की तो दुसरा कोणी नसून बिरबल होता. “महाराज! मला तुम्हाला सांगायचे होते की, तुमची इच्छा पूर्ण होणे शक्य नाही.” यावर महाराज म्हणाले-“होय, बिरबल, मला आताच ते समजले आहे.” 
 
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा