बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (20:28 IST)

पौराणिक कथा : भीष्म पितामहाचे पाच चमत्कारिक बाण

Kids story
Kids story : ही घटना त्या वेळी घडलेली आहे जेव्हा कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध चालू होते. पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढत होते, परंतु कौरवांचा मोठा भाऊ दुर्योधन याला वाटले की पितामह भीष्म पांडवांचे नुकसान करू इच्छित नाहीत. तसेच  दुर्योधनाचा असा विश्वास होता की पितामह भीष्म हे खूप शक्तिशाली होते आणि पांडवांना मारणे त्यांच्यासाठी खूप सोपे होते. तसेच या विचारात मग्न झालेला दुर्योधन भीष्म पितामह जवळ आला. दुर्योधनाने पितामह यांना सांगितले की, तुम्हाला पांडवांना मारायचे नाही, म्हणूनच तुम्ही कोणतेही शक्तिशाली शस्त्र वापरत नाही. दुर्योधनाचे म्हणणे ऐकून पितामह भीष्म म्हणाले, “तुला असे वाटत असेल तर मी उद्याच पाच पांडवांचा वध करीन.तसेच माझ्याकडे पाच चमत्कारिक बाण आहे, जे मी उद्या युद्धात वापरणार आहे. भीष्म पितामहाचे बोलणे ऐकून दुर्योधन म्हणाला, "माझा तुमच्यावर विश्वास नाही, म्हणून मला हे पाच चमत्कारिक बाण द्या." मी त्यांना माझ्या खोलीत सुरक्षित ठेवीन.' भीष्मांनी ते पाच बाण दुर्योधनाला दिले.
 
आता श्रीकृष्णाला याची कल्पना आली. त्याने अर्जुनला याची माहिती दिली. हे ऐकून अर्जुन घाबरला आणि हा त्रास कसा टाळायचा याचा विचार करू लागला. श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली की एकदा तू दुर्योधनाला गंधर्वांपासून वाचवले होते, तेव्हा दुर्योधनाने तुला सांगितले होते की या उपकाराच्या बदल्यात तू भविष्यात माझ्याकडून काहीही मागू शकतोस. हीच योग्य वेळ आहे, तू दुर्योधनाला ते पाच चमत्कारी बाण माग.अशा प्रकारे तुमचे आणि तुमच्या भावांचे प्राण वाचू शकतात. 
 
तसेच अर्जुनला श्रीकृष्णाचा सल्ला अगदी योग्य वाटला. त्याला दुर्योधनाने दिलेले वचन आठवले. त्यावेळी सर्वांनी दिलेली आश्वासने पळाले जायचे असे बोलले जाते. वचन भंग करणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जात होते. जेव्हा अर्जुनाने दुर्योधनाला त्याच्या वचनाची आठवण करून दिली आणि पाच बाण मागितले तेव्हा दुर्योधन नकार देऊ शकला नाही. दुर्योधनाने आपले वचन पाळले आणि ते बाण अर्जुनाला दिले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या भक्त पांडवांचे रक्षण केले.

Edited By- Dhanashri Naik