रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (22:37 IST)

मनोरंजक बाल कथा : शिकारी स्वतःच शिकार झाला

एकदा एक शिकारी घनदाट जंगलातून जात होता. त्याच्या कडे बंदूकही होती. तो शिकार करण्याचा विचार करून जंगलात शिरला. जंगलात शिरल्यावर तो बघतो तर त्याला एका झाडाच्या फांदीवर एक कबुतर बसलेला दिसतो. 
 
तो आपल्या बंदुकांचं नेम त्या कबुतराकडे धरतो आणि तो बंदूक चालवणारच होता तेवढ्यात मागून वारुळातून एक साप येतो आणि त्याला दंश करतो ज्यामुळे तो बंदूक चालवू शकत नाही आणि खाली कोसळतो. सापाने केलेल्या दंशामुळे त्याच्या विषाचा प्रभावच इतका घातक असतो की त्याचे संपूर्ण शरीर निळं पडत. तो जमिनीवर गडबड लोळू लागतो त्याच्या तोंडातून फेस निघू लागतो.  
 
मरतांना तो शिकारी विचार करू लागतो की - '' सापाने माझ्या बरोबर तेच केले जे मी त्या निर्दोष कबुतराशी करू इच्छित होतो. असं म्हणत तो मरण पावतो.
 
तात्पर्य - दुसऱ्यांच्या वाईट चिंतणाऱ्याच नेहमी वाईट होऊन तो संकटातच सापडतो.