शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा : कोण शहाणा, कोण मूर्ख ?

दरबारातील मंडळींना एकदा बादशहाने विचारले, ''कोणाला शहाणा म्हणावे आणि मूर्ख कोणाला म्हणावे?'' 

यावर दरबारी मंडळी उत्तरादाखल बरेच मोठे चर्‍हाट वळू लागली असता बादशहा भडकून बिरबलाला म्हणाला, ''बिरबल, तू दे बर माझ्या प्रश्नाचे उत्तर!''

यावर बिरबल म्हणाला, ''महाराज, जो माणूस मनात योजलेले बेत मेहनत, चिकाटी आणि योजना करून तडीस नेतो, तो शहाणा, आणि नुसतेच मोठमोठे बेत करून जो माणूस ते विसरून जातो किंवा योजलेली कामे तडीस नेण्यासाठी त्याची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेत सोडून देतो, तो मूर्ख.''

बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा समाधान पावला.