रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

Kids story a
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होती. ते सतत एकमेकांशी भांडायचे. शेतकऱ्याने अनेक वेळेस मुलांना समजावले की, भांडू नका. पण त्याचे कोणीही ऐकले नाही. एक दिवस शेतकरी खूप आजारी पडला. 
 
त्याने आपल्या मुलांना जवळ बोलवले. त्याने त्या मुलांना एक लाकडाची मोळी दिली.  व तिला तोडण्यास सांगितले. पण एकही मुलगा त्या मोळीला तोडू शकला नाही. शेतकऱ्याने ती मोळी सोडायला सांगितली व आपल्या मुलांना लाकूड तोडण्यास सांगितले.त्या मुलांनी एक एक करून सर्व लाकडे तोडलीत. आता शेतकऱ्याने आपल्या मुलांना सांगितले की, जर तुम्ही लाकडाच्या मोळी प्रमाणे एकत्रित राहिला तर तुम्हाला कोणीही नुकसान पोहचवणार नाही. जर तुम्ही सतत भांडत राहिला तर तुमचेच नुकसान होईल. मुलांना आपली चूक समजली व ते परत कधीही भांडले नाही.शेतकऱ्याला मोठा आनंद झाला. 
तात्पर्य : एकतेच्या बळात खूप मोठी शक्ती असते. 

Edited By- Dhanashri Naik