रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

अकबर-बिरबलची कहाणी : एक माणूस तीन गुण

akbar birbal
The Story of Akbar-Birbal : एकदा अकबर आणि बिरबल बागेत बसले होते. तेव्हा अकबराने बिरबलाला विचारले, तुला वेगवेगळ्या बोली बोलण्याची क्षमता असणारा माणूस सापडेल का? तर यावर बिरबल म्हणाले की, का नाही, पोपटाची भाषा बोलणारा, सिंहाची भाषा बोलणारा आणि गाढवाची भाषा बोलणारा माणूस मला माहीत आहे. तसेच हे ऐकून अकबरला आश्चर्य वाटले. त्यांनी बिरबलाला त्या माणसाला दुसऱ्या दिवशी दरबारात उपस्थित करण्यास सांगितले.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल त्या माणसाला घेऊन दरबारात आला. व त्याला दारूची एक छोटी बाटली दिली. व त्या माणसाला दारू पाजली आता मद्यधुंद अवस्थेत अकबर बादशाहासमोर तो माणूस उभा होता. दारू प्यायल्याचे कळले तर राजा त्याला शिक्षा करेल हे त्याला माहीत होते. म्हणूनच तो विनवणी करू लागला. आणि राजाची विनंती करू लागला. तेव्हा बिरबल म्हणाले की, महाराज, हा  शिक्षेच्या भीतीने जे बोलतोय ती पोपटाची भाषा आहे.
 
त्यानंतर बिरबलाने त्या माणसाला दारूची दुसरी बाटली प्यायला दिली. आता तो माणूस पूर्णपणे नशेत होता. तो अकबर राजासमोर छाती वर करून उभा राहिला. तो म्हणाला, मग काय नगरचा राजा झालास तर. मी पण माझ्या घरचा राजा आहे. मी इथे कोणाला घाबरत नाही.बिरबल म्हणाला, महाराज, आता दारूच्या नशेत न घाबरता जे काही बोलत आहे, ती सिंहाची भाषा आहे.
 
आता पुन्हा बिरबलाने त्या माणसाला दुसरी बाटली पाजली. यावेळी तो माणूस दचकला आणि खाली पडला आणि जमिनीवर पडून हात पाय हवेत फिरवत विचित्र आवाज काढू लागला. आता बिरबल म्हणाला की, महाराज आता जे बोलतोय ती गाढवाची भाषा आहे.
 
आता मात्र अकबर बिरबलाच्या चातुर्याने खूश झाला आणि त्यांनी बिरबलला बक्षीस दिले.

Edited By- Dhanashri Naik