बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:50 IST)

बोथ कथा : ईश्वराचा न्याय

कृष्णदेव राय एक महान राजा होते. ते न्यायप्रियते साठी प्रख्यात होते.ते धर्मानुसार राज्य करायचे. त्यांची प्रजा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि त्यांच्या कार्याने संतुष्ट होती. ते आपल्या प्रजेकडे लक्ष देत होते. 

एकदा त्यांच्या राज्यात चोरी होण्याच्या घटनेमध्ये वाढ होऊ लागली या कारणामुळे महाराजांना काळजी होऊ लागली. चोर खूपच हुशार होते त्यामुळे ते सैनिकांच्या हातीच लागत नव्हते. राजाने सभा बोलविली आणि आपल्या महामंत्री आणि सेनापतीला चोरट्यांना पकडण्याचा आदेश दिला आणि चोरट्यांना पकडून सगळ्यांच्या समोर 500 कोडे लावण्याचा आदेश दिला. जेणे करून ही शिक्षा ऐकून कोणी पुन्हा चोरी करणार नाही आणि हे त्यांच्या साठी धडा असेल.
 
एके दिवशी सैनिकांनी काही चोरट्यांना चोरी करताना पकडले आणि महाराजां समोर नेले. महाराजांनी त्या चोरट्यांना 500 कोडे मारण्याची शिक्षा दिली. सैनिक त्यांना कोडे मारणार की तेवढ्यात त्या चोरांपैकी एक चोर फार हुशार होता त्याने बघितले की महाराजांच्या सिंहासनाच्या मागे भगवान व्यंकटेशाचे आशीर्वाद देतानांचे चित्र आहे. त्या चोराला शिक्षे पासून वाचण्याची युक्ती सुचली. त्यांनी लगेच म्हटले की 'महाराज आपण भगवान व्यंकटेशाच्या चित्राच्या समोर आहात. देवांच्या चित्रा समोर आपण कसे हे होऊ देत आहात ? आपले सैनिक असं कसं करू शकतात. सैनिकाचे हात देखील थांबले.
 
तेवढ्यात तेनालीराम आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले -' की म्हणूनच महाराजांनी 500 कोडे मारण्याची शिक्षा दिली आहे आणि देवांनी देखील त्याला अनुमोदन दिले आहे. असं म्हणून तेनालीराम सह संपूर्ण दरबारात उपस्थित मंडळी हसू लागले आणि चोरट्यांचा चेहऱ्याचा रंग फिकट झाला.