शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:52 IST)

कुंभकर्णाच्या झोपेचे रहस्य

रामायणामध्ये एका राक्षसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याबद्दल सर्वांना कौतुक वाटतं कारण तो सहा महिने झोपत होता आणि सहा महिने जागा राहत होता. त्याचे नाव कुंभकर्ण होते. पण, तो इतक्या दीर्घकाळासाठी निद्रिस्त कसा काय राहू शकत होता ह्याविषयीचे कथा जाणून घ्या-
 
एकदा ब्रह्मदेवाने रावण, विभीषण आणि कुंभकर्ण या तीन भावांना कोणतेही वरदान मागण्यास सांगितले. इंद्राला कुंभकर्णाचा हेतू माहीत असल्याने त्याने आई सरस्वतीची विनवणी केली आणि कुंभकर्णाने चुकून इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन ब्रह्मदेवाकडे मागितले. या कारणास्तव, कुंभकर्णाने भगवान ब्रह्मदेवाकडे कायमस्वरूपी झोपण्यासाठी वरदान मागितले. रावणाला याची माहिती नव्हती पण नंतर त्याने ब्रह्मदेवाला वरदान परत घेण्याची विनंती केली पण त्याने सांगितले की कुंभकर्ण अर्धा वर्ष झोपेल आणि अर्धा वर्ष जागे होईल. कुंभकर्ण श्री रामाबरोबर युद्ध सुरू होण्यापूर्वी झोपले होते आणि अनेक प्रयत्नांनंतर त्यांना युद्धासाठी जागृत करण्यात आले.
 
कुंभकर्णाच्या झोपेविषयी अनेक दंतकथा आहेत. असे म्हणतात की कुंभकर्ण खूप अन्नग्रहण करत असे. त्यामुळे जर तो नेहमी जागाच राहिला असता तर सृष्टीमधील कुठलाच अन्न मिळालं नसतं त्यामुळे सृष्टीची काळजी असलेल्या बिभीषणाने कुंभकर्णासाठी झोपेचे वरदान मागितले होते.