मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)

तेनालीराम आणि माठाची कहाणी

tenaliram kahani
एकदा कोणत्या तरी कारणामुळे राजा कृष्णदेव राय तेनालीराम वर नाराज झाले. ते एवढे नाराज झाले की, ते तेनालीरामला म्हणाले की, “पंडित तेनालीराम, आता तू मला तुझे तोंड दाखवू नकोस. जर तू माझ्या आदेशाचे पालन केले नाहीस तर आम्ही तुला शिक्षा देऊ.” राजाचे हे बोलणे ऐकून तेनालीराम तिथून निघून गेले.
 
दुसऱ्या दिवशी दरबार लागला, तेनालीरामचा मत्सर असलेल्या काही मंत्र्यांनी महाराजांच्या दरबारात येण्यापूर्वीच त्यांचे कान भरायला सुरवात केली. एक मंत्री म्हणालला की, “महाराज तुम्ही नकार देऊनही तेनालीराम दरबारात आला आहे. हा तुमच्या आदेशाचा अवमान आहे. यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे.” हे ऐकून महाराज क्रोधित झाले.
 
महाराज दरबारात पोहचताच, त्यांनी पहिले की, तेनालीराम आपल्या डोक्यामध्ये माठ घालून उभा होता. त्यांचे हे वागणे पाहून महाराज तेनालीरामला म्हणाले की, “पंडित तेनालीराम, आम्ही तुम्हाला सांगितले होते की, तू मला तुझे तोंड दाखवयाचे नाहीस.तू माझ्या आदेशाचे पालन का केले नाहीस?
 
तेनालीराम यावर म्हणाले की, “महाराज मी तुम्हाला माझे तोंड दाखवले नाही.मी चेहऱ्यावर माठ घातलेला आहे. या माठाला असलेले दोन छिद्रांमधून मला तुमचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.  पण माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही आहे.
 
तेनालीरामचे हे म्हणणे ऐकून महाराज कृष्णदेव राय हसायला लागले. व म्हणाले की,“पंडित तेनालीराम, तुमच्या बुद्धीपुढे आमचा राग टिकू शकत नाही. आता या माठाला काढ आणि आपल्या जागेवर जाऊन बैस. असा आदेश महाराजांनी तेनालीरामला दिला. 

Edited By- Dhanashri Naik