''झाड बोलू लागले''
बोध कथा मराठी
कृणाल कंपनीची नवी ऍनिमेशन व्हीसीडी कृणाल एंटरटेनमेंट कंपनीने ' के - टून्स' या सिरीजद्वारे ''झाड बोलू लागले'' ही बोधकथेची नवी ऍनिमेशन आणि कार्टूनची व्हीसीडी प्रकाशित केली आहे. भद्रिक वीरा यांनी प्रस्तुत केलेल्या या व्हीसीडीमध्ये ऐकून चार मजेशीर कथांचा समावेश आहे.त्यात 'झाड बोलू लागले', 'फ्रेंच राजा आणि सुंदर जेन', 'वडील आणि गाढव' व 'चार मित्र' अशा चार मनोरंजक आणि बोधप्रद कथांचा समावेश आहे. मनोरंजनाबरोबरच जीवनात व्यावहारिकदृष्ट्या बोध देणाऱ्या या कथा छोट्याबरोबरच मोठ्यानंहीआवडतील व सर्वजण एकत्र बसून ह्या व्हीसीडीचा आनंद घेऊ शकतील ह्या हेतूने ही व्हीसीडी निर्माण करण्यात आली आहे. ही व्हीसीडी फक्त ३६ रुपयांत सर्वत्र उपलब्ध आहे.