रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (13:19 IST)

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करतांना करू नका या चुका

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करणे एक सोपा पर्याय आहे. पण हेच जेवण योग्य पद्धतीने गरम केले नाही तर ते नुकसानदायक देखील ठरू शकते. याकरिता आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत तसेच मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या, ज्यामुळे तुम्ही  मायक्रोवेव्हचा सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने उपयोग करू शकाल. 
  
मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करण्यापूर्वीच्या टिप्स-
पाणी शिंपडावे-
कोरडे आणि कडक पद्धतीचे पदार्थ गरम करण्यापूर्वी त्यावर थोडे पाणी शिंपडावे. ज्यामुळे पदार्थाला थोड्या प्रमाणात ओलावा येईल.
 
समान प्रमाणे गरम करा-
जेवण समान प्रमाणे गरम करा. याकरिता त्याला एका भांडयात पसरवून ठेवावे. कारण अनेक वेळेस मधील पदार्थाची बाजू थंडच राहते. याकरिता भांड्यात पदार्थ पसरवून ठेवावे. 
 
झाकणाचा उपयोग करावा-
जेवण गरम करण्यापूर्वी त्यावर झाकण ठेवावे. पण झाकण थोडे खुले ठेवावे.ज्यामुळे वाफ बाहेर निघू शकेल. यामुळे जेवण कोरडे पडणार नाही तर योग्य पद्धतीने गरम होईल.
 
व्यवस्थित ढवळावे-
जर तुम्ही पातळ पदार्थ किंवा सूप गरम करीत असाल तर, तर काही सेकंड तो ढवळावा. ज्यमुळे तो समप्रमाणात गरम होईल व योग्य तापमान राहील.
 
चेक करावे-
जास्त वेळ जेवण मायक्रोवेव्हमध्ये सोडू नये. काही सेकंड किंवा मिनिटभरच ठेवावे. व सतत चेक करावे. गरज असेल तर जास्त वेळ ठेवावे. 
 
मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करतांना होणाऱ्या चुका-
कधीही धातूच्या भांड्यांना मायक्रोवेव्हमध्ये ठेऊ नका. यामुळे स्पार्क होऊ शकते. व मायक्रोवेव्ह खराब होऊ शकते.
 
जास्त वेळ मायक्रोवेव्हमध्ये जेवण ठेवल्यास ते कोरडे पडू शकते. व चव बिघडू शकते.
 
अनेक प्रकारचे प्लास्टिक कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये सुरक्षित नसतात.  
 
जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये कोणतेही सील पॅकेट गरम करीत असला तर त्यामध्ये छोटे छोटे छिद्र करावे. ज्यामुळे वाफ निघण्यास मदत होईल.
 
घट्ट झालेल जेवण थोडावेळ वितळू द्यावे. मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करावे. लागलीच ठेवल्यास जेवण बाजूने गरम होते पण मधिल बाजू थंड राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik