गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (15:57 IST)

सॉफ्ट कुकीज बनवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

cookies
अनेक महिलांना स्वयंपाक करण्याची आवड तर असतेच तसेच नवीन नवीन पदार्थ देखील बनवायला आवडतात. तसेच काही महिलांना केक, कुकीज असे अनेक बेकरी पदार्थ घरीच बनवायला आवडतात. तसेच  जर तुम्ही घरी कुकीज बनवणार असाल तर काही सोप्या ट्रिक अवलंबून तुम्ही त्यांना मऊ बनवू शकतात. आज आपण अश्या काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही कुकीज मऊ बनवू शकाल.
 
कुकीज जास्त वेळ बेक करू नका-
कुकीज बनवताना ते  नीट बेक करावे. विशेषतः जर तुम्हाला कुकीज मऊ हवे असतील तर जास्त बेक करू नका. ओव्हरबेकिंगमुळे कुकीज कडक होऊ शकतात.
 
कॉर्न स्टार्च-
कुकीज बॅटर बनवताना त्यात 2 चमचे कॉर्न स्टार्च घालावे. ज्यामुळे कुकीज मऊ होतील. 
 
जाड कुकीज बनावे-
पातळ कुकीज मऊ होत नाहीत, त्याकरिता कुकीज बनवताना पिठ घट्ट ठेवा. यामुळे कुकीज मऊ होतील. याशिवाय कुकीज बेक करण्यापूर्वी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे
.  
योग्य प्रमाणात घटक वापरावे-
कुकीज बनवताना त्यातील घटकही योग्य प्रमाणात वापरावेत. अनेक वेळा कंटेंट कमी-जास्त होऊन पदार्थ बिघडतो. याकरिता कुकीज बनवण्यापूर्वी घटकांचे मोजमाप करून ते वापरावे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik