झटपट अंडीचे साल काढण्यासाठी या ट्रिक अवलंबवा
Kitchen Tips : अंडी लवकर उकडले जातात पण अनेकांना त्यांचे साल काढायला वेळ लागतो. याकरिता आपण आज पाहणार आहोत अश्या काही ट्रिक ज्यामुळे अंडीचे साल लगेच काढता येतील. तर चला जाणून घेऊ या सोप्या ट्रिक
1. बेकिंग सोडा-
अंडी उकडायला ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालावा. उकडल्यानंतर अंडी थंड पाण्यामध्ये घालावे. आता हलक्या हातांनी अंडीचे साल काढावे.
2. उकडल्यानंतर अंडी जार मध्ये हलवा-
उकडलेले अंडी थंड झाल्यानंतर काही वेळ पाण्यामध्ये ठेवावे. आता एका जार मध्ये काही प्रमाणात पाणी घालावे व अंडी त्यामध्ये घालावे. आता जार चे झाकण बंद करावे व हळूहळू हलवावे. जार मध्ये अंडी फिरल्याने त्यांचे साल निघून जातील.
3. व्हिनेगर-
अंडी उकडताना त्यामध्ये एक टेबलस्पून व्हिनेगर घालावे. अंडी उकडल्यानंतर ती थंड पाण्यामध्ये घालावी. आता साल काढावे. झटपट साल निघते.
4. बर्फाचे पाणी-
अंडी उकडल्यानंतर लागलीच बर्फाच्या पाण्यामध्ये घालावी. कमीतकमी 10 मिनिट बर्फाच्या पाण्यामध्ये अंडी राहू द्यावी. आता अंडी हलक्या हाताने दाबून साल काढावे. या उपायामुळे अंडीची साल झटपट निघते व याचे टेक्सचर देखील बनते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik